सावंतवाडीकरांनी पाळला कडकडीत बंद…

490
2
Google search engine
Google search engine

जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद;शहरासह तालुक्यातील रस्ते “सुनसान”…

सावंतवाडी.ता,२१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या “जनता कर्फ्यूच्या” आव्हानाला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी एरवी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गजबजणार संपूर्ण शहर बंद होते. गेल्या काही वर्षातील हा कडकडीत बंद असल्याचा जाणकारांच्या मते सांगण्यात आले. रस्त्यावर पोलिस,पालिका आरोग्य आणि मेडिकल व पेट्रोल पंप सारखे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीच नसल्यामुळे सारे काही शांत वातावरण होते.