स्वच्छता विषयक सुविधा मिळण्यासाठी १४ वित्त आयोगातून निधी द्या…

145
2
Google search engine
Google search engine

प्रेमानंद देसाई;ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता होणे गरजेचे

दोडामार्ग ता.२७:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता व आरोग्य विषयक चांगली सुविधा मिळण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केली आहे.याबाबत त्यांनी ग्रामीण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यासाठी तसेच लोकांना मास्क सॅनिटायझर आदी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापर करण्यात यावा,असेही त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.