माकडतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी मणीपालचे सहकार्य घ्या..

120
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिका-यांचे आवाहन;आठवड्यातून दोनदा संशयितांची रक्त तपासणी करा…

बांदा ता.२०: माकडतापाचे सर्वाधिक रुग्ण बांद्यात सापडल्याने संशयितांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजन आठवड्यातून किमान दोन दिवस करावे, तसेच मणीपाल रुग्णालय प्रशासनाशी आरोग्य विभागाने चर्चा करून बांद्यात रक्त तपासणी केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत,अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी येथे दिल्यात.
माकडताप व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.