वडाचापाट येथे वृद्धाची आत्महत्या…

884
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १४ : मालवण तालुक्यातील वडाचापाट थळकरवाडी येथील वृद्धाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. येथील सदानंद नारायण पालव वय -६५ यांनी घराच्या छपरास गळफास घेतल्याची घटना आज दुपारी १२.३० च्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रमोद नाईक, विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय करत आहेत.