जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांचा एकमेकांवर पाळ-कोयत्याने हल्ला…

1818
2
Google search engine
Google search engine

सातार्डा-ख्रिश्चनवाडी येथील घटना ; पाच जण जखमी,सहा जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल…

सावंतवाडी, ता. १९: जमिन जागेच्या वादातून सातार्डा येथे दोन कुटुंबे हातात पाळ-कोयता घेवून एकमेकांना भिडली. यात तब्बल पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी ख्रिश्चनवाडी परिसरात घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे.दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सातार्डा येथील फर्नांडीस कुटुंबियांमध्ये जमिन जागेच्या वादातून गेली अनेक वर्षे वाद आहेत.आज दुपारी किरकोळ कारणावरून या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले.यावेळी हातात पाळ-कोयता, लाठ्याकाठ्या घेवून दोन्ही कुटुंबे एकमेकांना भिडली. यात एकाच्या डोक्यावर तब्बल कोयत्याचे पाच वार झाले आहेत. हा प्रकार घडल्यानंतर जखमींना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पहिली तक्रार जॉनी पेद्रु फर्नांडीस (रा. ख्रिश्चनवाडी) यांनी दिली आहे. त्यानुसार कुस्तान आशिष फर्नांडीस,जाॅनी पेद्रु फर्नाडीस आणी प्राची हळदणकर या तिंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी तक्रार कुस्तान उर्फ बाबुशा आशिष फर्नांडीस यांनी दिली आहे. त्यानुसार जॉनी पेद्रु फर्नांडिस, वेलेटीन जॉनी फर्नांडीस,केव्हीन बावतीस फर्नाडीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उशिरापर्यंत या प्रकरणी तपास सुरू होता. घटनास्थळी पोलिस रवाना झाले होते.या बाबतचा अधिक तपास श्री.खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, गुरू नाईक, प्रकाश कदम आदी करत आहेत.