राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेस किट्सचे वितरण…

166
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २५ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सना फेस किट्स प्रदान करण्यात आले.

कोरोना विरोधातील लढाईत डॉक्टर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची सुरक्षितता महत्वाची बनली आहे. या संकट काळात डॉक्टरांच्या सेवेत त्यांना हातभार लावण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सना फेस किट्सचे वाटप जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी शानबाग यांच्याकडे फेस किट्स सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादीचे जिल्हा ओबीसी अध्यक्ष बाळा कन्याळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शिवाजी घोगळे, जिल्हा युवक उपाध्यक्ष मिलिंद घाडगे, शहराध्यक्ष आगोस्तिन डिसोझा, सुजन खोबरेकर, प्रमोद कांडरकर, रमण वाईरकर, लिनन डिसोझा, बाबू डायस आदी उपस्थित होते.