मान्यता मिळाल्यास २० दिवसात पडवेतील हाॅस्पीटलमध्ये लॅब सुरू करू

350
2
Google search engine
Google search engine

मान्यता मिळाल्यास २० दिवसात पडवेतील हाॅस्पीटलमध्ये लॅब सुरू करू

भाजप शिष्टमंडळाचे आश्वासन : काेराेनामुळे मृत्यू झाल्यास प्रशासनाच्या विराेधात गुन्हा दाखल करू

ओरोस, ता. २६ : आमच्या पडवे येथील कॉलेजला कोरोना लॅब उभी करायची नसल्यास शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या कॉलेजमध्ये ती उभी करा. परंतु लॅब लवकर सुरु करा. आम्हाला मान्यता देवून मशिनरी पुरविल्यास पडवे कॉलेजमध्ये २० दिवसांत लॅब सुरु करू शकतो. पण लॅब न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यु झाल्यास प्रशासना विरोधात एफआयआर दाखल करणार. तसेच जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहोत, असा इशारा नितेश राणे यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला.
भाजपच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जयदेव कदम आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज येथे कोरोना लॅब उभारण्यासाठी लेखी प्रस्ताव मंजुलक्ष्मी यांच्याकडे सादर केला.
यावेळी पुढे बोलताना आमदार राणे यांनी सत्ताधारी लोकांना राजकारण करायचे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक खरी माहिती देत नाहीत. आमच्या पडवे कॉलेजमध्ये लॅब सुरु करण्याचा विचार शिवसेनेच्या एका नेत्यांनी पुढे आणला. त्यामुळे राजन तेली यांच्या मोबाईलवरुन खासदार नारायण राणे यांच्याशी पालकमंत्री यांनी संपर्क साधत ही मागणी केली. त्याला खासदार राणे यांनी मान्यता दिली. सीएस डॉ. चाकुरकर यांनी आपल्याबरोबर संपर्क साधुन तशी मागणी केली. आम्ही त्याला मान्यता दिल्यावर पालकमंत्री यांनी आमच्या कॉलेजची बदनामी सुरु केली. आम्ही एकीकडे जिल्ह्याच्या भवितव्यासाठी मदतीचा हात पुढे करायचा. मात्र यांनी आमची बदनामी करायची, हे योग्य नाही असे आमदार राणे म्हणाले.