पावसाळी मासेमारी बंदी कालावधी कमी करण्यास मच्छीमार संघटनांचा विरोध…

338
2
Google search engine
Google search engine

 

कालावधी वाढविल्यास मत्स्य संपदा नष्ट होण्याची भीती…

मालवण, ता. २६ : केंद्र सरकारने काही बड्या मच्छीमारांना ३० जूनपर्यंत मासेमारी कालावधी वाढवून दिला आहे. याला आमचा तीव्र विरोध राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीचा साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब (वाळी) हवामानामुळे जिवीत व वित्तहानी होण्याचा धोका असतो. मासेमारी बंदीमुळे जिवीत व वित्तहानी टाळता येते ; मात्र काही मोठ्या मच्छीमारांनी ३० जूनपर्यंत मासेमारी कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने मासेमारी कालावधी वाढवून दिल्याचेही समजले आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. राज्याच्या व केंद्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी कालावधी वाढवून दिल्यास मत्स्य संपदा नष्ट होण्याची भिती आहे व मत्स्य संपदा नष्ट झाल्यास भविष्यात मच्छीमार संपुष्टात येईल. याची माहिती केंद्र सरकारला कृपया द्यावी व केंद्र सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याची शिफारस करून पुर्वीचा १ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी करण्याची शिफारस करावी. पावसाळी मासेमारी बंदी १ जून ते ३१ जुलैपर्यंत काढलेले बंदी आदेश अथवा तो १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा. राज्याच्या व केंद्राच्या जलधी क्षेत्रात काटेकोरपणे लागू करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, खजिनदार रमेश मेहेर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ सल्लागार जनार्दन तांबे, सचिव मोरेश्‍वर वैती, सचिव उल्हास वाटकरे, रा. म. संघटक पुर्णिमा मेहेर, सचिव ज्योती मेहेर, मुंबई म. सं. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष राजेन मेहेर, उपाध्यक्ष पी. एम. चौगुले, उपाध्यक्ष फिलपी मस्तान, परशुराम मेहेर, मनोहर बैले, अमजद बोरकर, दिलिप घारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.