“ते” रुग्ण अखेर ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविले…

1341
2
Google search engine
Google search engine

पालिका पदाधिकार्‍यांनी घेतली भेट; नगराध्यक्षांनी मानले आरोग्य प्रशासनाचे आभार…

सावंतवाडी, ता.२८:  येथील उपजिल्हा रुग्णालयात कारिवडे येथील ते कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली.याठिकाणी आयसोलेशन वॉर्डची सोय नाही.प्रसुत झालेल्या महिला व बालके आहेत.त्यामुळे येथे रुग्ण ठेवण्यात येऊ नये,अशी मागणी केली.ती मागणी मान्य करून जिल्हा प्रशासनाने ते रुग्ण ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात हिरवा कंदिल दिला.आरोग्य प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी वैद्यकिय अधिक्षक उत्तम पाटील व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.