मास्क न वापरणार्‍यांना सावंतवाडीत दणका

274
2
Google search engine
Google search engine

पोलिस व पालिकेची संयुक्त कारवाई : खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सावंतवाडी, ता. २९ : कोरोनाचे रुग्ण एकिकडे वाढत असताना मास्क न घालता शहरात फिरणार्‍या तब्बल वीसहून अधिक जणांना आज येथील पालिका व पोलिस प्रशासनाकडून दणका देण्यात आला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातील बरेचसे लोक हे प्रतिष्ठित व उच्चभू लोक आहेत. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.
दरम्यान रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावे असे आवाहन सावंतवाडी पालिका व पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. याबाबतची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिली.