दाभिल नदीत कोसळलेली माती उपसा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू….

206
2
Google search engine
Google search engine

जलसंपदा विभागाचा पुढाकार; खासदारांच्या सुचनेनंतर यंत्रणा हलली….

सावंतवाडी,ता.११: दाभिल नदीमध्ये सरमळे धरणाची पडलेली माती उपसा करण्याचे काम आज पासुन जलसंपदा विभागाने सुरू केले आहे.
याबाबत खासदार विनायक राऊत यांनी त्यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज भेट दिली. तसेच हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत माजी उपसभापती चंद्रकांत कासार, विष्णू घाडी, भाऊ गवस, महेंद्र परब आदी उपस्थित होते. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या पावसात या नदीपात्रात माती कोसळली होती. मात्र संबधित ठेकेदाराने बाजूला काम करून सुध्दा ही माती काढली नाही. असा आरोप ग्रामस्थांनी नुकताच राऊत यांच्या दौर्‍यात केला होता. त्यानुसार पुन्हा रस्ता वाहून जावू नये, यासाठी तात्काळ ही माती दुर करण्यात यावी. अशा सुचना खासदार राऊत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आल्याचे श्री.राऊळ यांनी सांगितले.