मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतचं होण्याची गरज…

165
2
Google search engine
Google search engine

पुंडलिक दळवी; अन्यथा राष्ट्रवादीकडुन आंदोलन करण्याची तयारी…

सावंतवाडी ता.२३: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतचं होणे गरजेचे आहे.ते अन्यत्र नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही राष्ट्रवादी म्हणून गप्प बसणार नाही,असा इशारा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे दिला.दरम्यान यापुर्वी मुंबई-गोवा महामार्गासारखा विकास करणारा प्रकल्प शहराच्या बाहेरुन गेला त्यामुळे शहराला भकास करण्याचे काम कोण करीत असेल,तर येणारी पिढी अनेक गोष्टीपासून वंचित राहील,अशी भितीही श्री.दळवी यांनी व्यक्त केली.
श्री.दळवी यांनी आज आपली प्रतिक्रीया दिली.ते म्हणाले,या ठीकाणी तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात आले होते.मात्र जागेचे कारण पुढे करुन ते अन्य ठीकाणी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.हा सर्व प्रकार चुकीचा आहे.आपला कोणाला विरोध नाही. मात्र कोणी विरोधासाठी विरोध करीत असेल, तर ते चुकीचे आहे.जागेचा प्रश्न या ठीकाणी सोडविणे गरजेचे आहे.त्यासाठी लोकांसाठी काम करणारा पक्ष म्हणून आम्ही सर्व आमच्या नेत्यांशी बोलून चर्चा करू, मात्र यावर थेट पर्यायी जागा बदलणे योग्य नाही,असे त्यांनी सांगितले.