जिल्हा मानधन समितीवर राघोजी सावंत यांची निवड

143
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी. ता,२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन या जिल्हास्तरिय निवड समितीच्या सदस्यपदी राघोजी उर्फ बाळा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.समाजातील वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांनी समाज प्रबोधनासाठी आपले आयुष्य वेचून समाज एकसंघ रहावा व समाज उद्धारासाठी,समाज बांधणीसाठी, समाजाप्रती दिलेले योगदान लक्षात घेऊन जे साहित्यिक व कलावंत उत्पन्नाचा स्त्रोत नसल्यामुळे हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत,अशा मान्यवर वृद्ध साहित्यिकांना व वृद्ध कलावंतांना मदतीचा हातभार लावावा या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत जिल्हास्तरिय समिती गठित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देखील समिती गठित केली असुन, या समिती मध्ये सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील माजी पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राघोजी भगवान उर्फ बाळा सावंत यांची अशासकिय सदस्य पदी पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या शिफारसीवरुन पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.श्री.बाळा सावंत गेली चाळीस वर्षे समाजकारण व राजकारण या क्षेत्रात सक्रिय असून ते दिपक केसरकर यांचे निष्ठावान व खंदे समर्थक मानले जातात. पंचायत समिती सदस्य पदाच्या कालखंडात त्यांनी केसरकर यांच्या मदतीने व सहकार्याने कोट्यावधीची विकासकामे केसरी गावात व दशक्रोशित केली आहेत.सदर समिती मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत यांना मानधन मिळावे, यासाठी निवड करेल व त्यांना कायमस्वरुपी शासनाचे मानधन (पेंन्शन) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.