अडचणीत आलेल्या पतसंस्थांना जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करावा…

197
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील संचालकाच्या बैठकीत मागणी ; बाजार व्यवसाय बंद असल्यामुळे फटका

सावंतवाडी.ता,२६: लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. बाजारपेठा बंद असल्यामुळे पिग्मी बंद झाल्याचा हा मोठा परिणाम आहे,त्यामुळे अशा पतसंस्थांना उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेने कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करावा,अशी मागणी आज येथे झालेल्या पतसंस्था सदस्यांच्या बैठकीत करण्यात आली.आज पतसंस्थांना उर्जितावस्था आणण्याबाबत कोणते धोरण आखता येवू शकते. याबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली.
यावेळी गोविंद बांदेकर,उपाध्यक्ष सिमा मठकर,उमाकांत वारंग,शशिकांत नेवगी,दत्ताराम सावंत,सचिव नारायण तेंडोलकर आदी उपस्थित होते.याबाबतची माहीती संचालक श्री उमाकांत वारंग यांनी दिली.
ते म्हणाले कोरोना महामारीमुळे अचानक लॉकडाउन झाले आणि बाजारपेठ बंद असल्याचा तोटा थेट संस्थांना सहन करावा लागत आहे.बाजार व्यावसाय बंद असल्यामुळे रोजची पिग्मी बंद आहे.परिणामी संस्था खूप अडचणी येत आहे.त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.