सिंधुदुर्गात सरसकट लॉकडाऊन हे अन्यायकारक….

885
2
Google search engine
Google search engine

अमित सामंत; परिस्थिती बिघडल्यास जिल्हा प्रशासनाची जबाबदारी…

कुडाळ,ता.३०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊनचा निर्णय घोषित करणे जनतेवर अन्याय कारक आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सिंधूदूर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी २ जुलै ते ८ जुलै पर्यंत सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात लाॅकडाऊन घोषित करून सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे.
मार्च ते मे पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी कडक होता आणि हा कालावधी सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असतो.तो सिझन सुद्धा शासनाच्या जाहीर केलेल्या लाॅकडाऊन मुळे वाया गेला आणि जिल्ह्य़ातील बागायतदार शेतकरी मोठय़ा प्रमाणात अडचणीत येऊन कर्जबाजारी झाला आहे.आज शेतकरी वर्गाला पेरणीसाठी आवश्यक भात बियाणे.खते.औषधे आर्थिक समस्यांमुळे मिळणे मुश्किल झाले असतानाही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी येथील शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी वेग वेगळे उपाय शोधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतानाच आणि मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त असताना दोन दिवसात पावसाला सुरुवात झाली आहे आणि शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त असतानाच सिंधूदूर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सरसकट लाॅकडाऊन घोषित करून शेतकऱ्यांबरोबरच संपूर्ण जिल्ह्य़ातील जनतेला वेठीस धरण्याचे पद्धतशीरपणे काम केले आहे.
लाॅकडाऊन आवश्यक ठिकाणीच घोषित करणे आवश्यक होते. ज्या भागात पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. तेथील नियमानुसार आवश्यक अंतरापर्यंत हद्द निश्चित करून लाॅकडाऊन घोषित करणे आवश्यक असताना. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता संपूर्ण जिल्ह्यात अचानक लाॅकडाऊन घोषित करणे सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील जनतेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अन्याय झालेला आहे. या बाबत लाॅकडाऊन वर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर विचार करून ज्या भागात कोरोना रूग्ण आहेत. त्याच परिसरातील आवश्यक भागात लाॅकडाऊन ठेवावे. आणि अन्य भागातील लाॅकडाऊन शेतकर्‍यांच्या भल्या साठी अनलाॅक घोषित करावे.राज्यशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असले तरी याचा अर्थ संपूर्ण जिल्ह्य़ातील जनतेला बंदिस्त करून ठेवणे हा येथील जनतेवर अन्याय आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट लाॅकडाऊनच्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा. अन्यथा कोकणातील शेतकरी वर्गाचा संयम सुटल्यास आणी जिल्ह्य़ातील परिस्थिती स्फोटक बनल्यास त्याची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील. असा इशारा सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी दिला आहे.