शिवसेनेत आमचं मस्त चाललंय, उपद्रवी राजन तेलींनी भांडणे लावू नये…

304
2
Google search engine
Google search engine

रूपेश राऊळ; अन्यथा तुम्ही कसे अपयशी ठरला हे सांगू, साळगावकरांना इशारा…

सावंतवाडी ता.०२:शिवसेनेत आमचं मस्त चालल्लय,त्यामुळे उपद्रवी राजन तेलींनी दीपक केसरकर यांची चिंता करू नये,आमच्यात भांडणे लावू नयेत,केसरकरांनी राज्यस्तरावरचे पद भूषवले आहे.त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही,असा प्रतिटोला आज येथे आयोजित पत्रकार परिषद शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी लगावला.दरम्यान बबन साळगावकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करू नये,त्यांच्यावर पुन्हा त्यांनी टीका केल्यास तुम्ही नगराध्यक्ष असताना,कसे अपयशी ठरलात हे जनतेला सांगू,असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी दांडेली उपसरपंच योगेश नाईक, वेत्येचे माजी सरपंच सुनील गावडे उपस्थित होते.

यावेळी श्री राउळ म्हणाले, या ठीकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावरुन खासदार विनायक राउत यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र हा सर्व प्रकार चुकीचा आहे.हे हॉस्पिटल मंजूर होवून तब्बल नउ महिन्याचा कालावधी उलटला,मात्र जागेची समस्या निर्माण झाल्यानंतर पर्यायी जागा म्हणून खासदारांनी दोन जागा पाहील्या.यात पोलिस परेड मैदान आणि वेत्ये येथिल जागेचा समावेश होता.जरी जागा पाहीली असली तरी या त्या जागेबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.तसेच हे हॉस्पिटल सावंतवाडीतच व्हावे,अशी शिवसेनेची सुध्दा इच्छा आहे. त्यामुळे कोणी टोकाला जावून विरोध करीत असतील,तर ते चुकीचे आहे.
श्री.राउळ यांनी यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केेलेल्या टिकेला उत्तर दिले.ते म्हणाले, खासदारांनी शहराला काही दिले नाही.असे सांगणार्‍या साळगावकरांनी पहीला अभ्यास करावा. पंधरा दिवसापुर्वी दोन हायमास्ट दिवे दिले आहेत.तर तीन मोबाईल टॉवर दिले आहेत।त्यामुळे साळगावकरां सारख्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे अर्धवट माहीतीच्या आधारे टिका करू नये,आणी तसा प्रयत्न झाल्यास ते नगराध्यक्ष असताना कसे कमी पडले,आणी कीती निधी त्यांच्या काळात परत गेला हे आम्ही लोकांना सांगू
.त्यांनी यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टिका केली.कोरोनाच्या काळात मुंबईतील चाकरमानी या ठीकाणी आलेले असताना ते शहरातील ग्रामीण भागातील असा भेदभाव करणार्‍या परबांच्या विषयी काय बोलणार,त्यांच्यावर आपण यापुर्वीच टिका केली आहे.त्यामुळे केवळ त्यांनी गोष्टी न सांगता आपल्या माध्यमातून हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून द्यावी .यावेळी त्यांनी राजन तेलींवर टिका केली.तेली हे केवळ भांडणे लावण्याचे काम करीत आहेत.ते उपद्रवी आहेत.त्यामुळे त्यांनी आमदार केसरकरांवर टिका कींवा सल्ला देवू नये, श्री केसरकर यांनी मंत्रीपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टिका करण्याची त्यांची पात्रता नाही.आमचे शिवसेनेत मस्त चालले आहे.त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी करू नका.