सिंधुदुर्गात वकिलांच्या अधिवक्ता परिषद संघटनेची स्थापना…

260
2
Google search engine
Google search engine

अध्यक्ष पदी सूर्यकांत प्रभुखानोलकर,तर सचिव पदी संदेश तायशेटे…

ओरोस ता.०७:  सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकिलांच्या अधिवक्ता परिषद या संघटनेची स्थापना झाली असून या संघटनेचे अध्यक्ष म्हणून वकील सूर्यकांत प्रभुखानोलकर यांची,उपाध्यक्ष म्हणून वकील प्रकाश बोडस तर सचिव म्हणून वकील संदेश तायशेटे यांची नियुक्ती झाली आहे.
अधिवक्ता परिषद ही वकिलांची देशव्यापी संघटना असून, या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातही स्थापना झाली आहे. या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी अधिवक्ता परिषद राज्य अध्यक्ष वकील राम आपटे यांनी केली आहे. या संघटनेच्या निवडण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गुरुनाथ प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष प्रकाश विष्णू बोडस, सचिव संदेश कृष्णा तायशेटे , सह सचिव वेदिका विरेश राऊळ,खजिनदार राहुल रविंद्र तांबोळकर, सदस्य स्वप्नील सुभाष सावंत, स्वरुप नारायण पै,सौ अन्वी अभय कुलकर्णी, सोनू आत्माराम गवस, सिद्धार्थ माधव भांबुरे, प्रणव रामनाथ आंबीये, दीपक संभाजी म्हाडदळकर, सौ. माया रविकांत नाईक, कु. शिल्पा यशवंत टिळक, यतीश रत्नाकर खानोलकर मार्गदर्शक अजित उर्फ श्रीकृष्ण नारायण भणगे,अजित पांडुरंग गोगटे यांची निवड करण्यात आलेली आहे.