बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध…

123
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला.ता.८:
राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करत असल्याचे जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते श्री. इर्शाद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
हे कृत्य निंदनीय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या हल्ल्याची सखोल चौकशी करुन आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी तीव्र प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते श्री. इर्शाद शेख यांनी दिली. या घटनेचा निषेध नोंदवताना इर्शाद शेख म्हणाले की ,“राजगृह डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान ही ऐतिहासिक पवित्र वास्तू आहे. ही वास्तू देशातील १३० कोटी लोकांचे श्रद्धास्थान आहे. म्हणून या घटनेची सखोल चौकशी करुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे.