हेत-मौदे रस्त्यावर दरड कोसळली

313
2
Google search engine
Google search engine

वाहतूक ठप्प; पावसाची संततधार सुरूच

वैभववाडी,ता.८:
वैभववाडी तालुक्यात सोमवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे. धो-धो कोसळणा-या पावसामुळे बुधवारी सकाळी हेत-मौंदे पर्यायी मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. तर करुळ घाटात किरकोळ पडझड सुरु आहे.मात्र वाहतूक सुरु आहे.
सोमवारी मध्यरात्री पासून मुसळधार सुरू झालेल्या पावसाने हेत-मौंदे या नवीन पर्यायी मार्गावर भोम नवीन गावठाणनजीक रस्त्यावर दरड कोसळली आहे. तर हेत शेणकोंड नजीक मोरी गाळाने भरल्यामुळे मोरीवरुन पाणी जात आहे. दरड कोसळल्यामुळे भोम, मौंदे, आखवणे गावात जाणारा मार्ग बंद झाला आहे. आधीच लाॕकडाऊनमुळे एस. टी. सेवा गेले चार महिने बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
अत्यावश्यक कामासाठी नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दरड कोसळल्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या चोविस तासात ५९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.