मालवण तालुक्यातील पेंडूर- चरीवाडी येथे कंटेन्मेंट झोन….

678
Containment zone
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०९: मालवण तालुक्यातील मौजे पेंडूर-चरीवाडीच्या ३०० मीटर परिघामध्ये कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक २१ जुलै २०२० रोजी रात्री १२:०० पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व ५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळचे  उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.