संदेश पारकर यांच्या वाढदिनी होणार महारक्तदान शिबीर..

170
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१२ : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिनी होणारे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहेत. वाढदिनी कै सुबोध टिकले स्मरणार्थ १४ जुलै रोजी केवळ रक्तदान शिबीर होणार असून त्या शिबिरात सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संदेश पारकर मित्रमंडळाने केले आहे.

दरवर्षी संदेश पारकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जातो. यादिवशी ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांत आबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी संदेशप्रेमींची गर्दी उसळते. यावर्षीही भरगच्चं कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

१४ जुलै रोजी कणकवली कॉलेज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळून हे शिबीर घेण्यात येणार आहे. तरी संदेशप्रेमींनी या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा, अनावश्यक गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये, व्यक्तिगत पातळीवर गरजूना मदत करावी, असे आवाहन संदेश पारकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.