सिंधुदुर्गात आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले…

1497
2
Google search engine
Google search engine

दिवसभरात २८ रुग्णांची भर…

सिंधुदुर्गनगरी, ता. १० : आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी १५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ७ रुग्ण कणकवलीतील आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या १८१ नमुन्यांपैकी १५ पॉझिटिव्ह आणि १५२ निगेटीव्ह आले आहेत तर १४ पेडिंग आहेत.