उमेद फाउंडेशन कडून बांद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार…

124
2
Google search engine
Google search engine

कोरोनायोध्दा म्हणून गौरव; पत्रकार, लोकप्रतिनिधी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश…

बांदा,ता.१२:कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर समाजात जनजागृती आणि दक्षता घेण्याबरोबरच परिसरातील घडामोडींची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकार, आपला जीव धोक्यात घालून काम करणारे आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका व शिक्षकांचा उमेद फौंडेशनच्या वतीने ‘कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
येथील ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पत्रकार निलेश मोरजकर, संजय भाईप, राकेश परब, मयुर चराटकर, विराज परब यांचा तसेच सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, मकरंद तोरस्कर, किशोरी बांदेकर, केंद्रशाळेच्या मुळ्याध्यापिका सरोज नाईक, शिक्षक जे. डी. पाटील, स्वाती पाटील, ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना उमेद फौंडेशनचे जे. डी. पाटील म्हणाले की, उमेद संस्था राज्यपातळीवर गेली ७ वर्षे काम करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संस्थेने यावर्षी जिल्ह्यात ५०० तर सावंतवाडी तालुक्यात ६५ विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. यासाठी परिसरातील दात्यांनी मदत केली आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्धयांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आभार स्वाती पाटील यांनी मानले.