मालवणात काँग्रेसची १८ ऑगस्टला बैठक…

150
2
Google search engine
Google search engine

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हुसेन यांची उपस्थिती ; बैठकीकडे सर्वांचे लक्ष…

मालवण, ता. १६ : तालुका काँग्रेसची बैठक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता हॉटेल जानकी कुंभारमाठ- मालवण येथे आयोजित केली आहे. या बैठकीस प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी दिली.
मालवणात काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष बदला वरून कार्यकर्त्यांनी मधल्या काळात बैठक घेत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुका काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष बाळू अंधारी यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी मेघनाद धुरी यांची निवड जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केली होती. या बैठकीनंतर मालवणात बाळू अंधारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणीची बैठक घेऊन धुरी यांच्या निवडीला अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर बाळू अंधारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा अंधारी यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेसची बैठक होत आहे.
या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अन्य प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.