शेतकऱ्यांच्या दुध अनुदानासाठी भाजपा किसान मोर्चा मैदानात…

87
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले तालुक्यातुन मुख्यमंत्र्यांना २५० पत्रे पाठवली

वेंगुर्ले.ता.१८:
राज्यातील दुध उत्पादक शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा महायुतीने महादुध एल्गार आंदोलन सुरू केले आहे . त्यातील पहिला टप्पा म्हणुन मान. मुख्यमंत्री यांना ५ लाख दुध उत्पादक शेतकरयांची पत्रे पाठविण्यात येणार आहेत . व त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो पत्रे भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून पाठवली जाणार आहेत त्याचाच शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातुन २५० पत्रे पोस्टात टाकुन करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस व किसान मोर्चा संयोजक प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापु पंडित, जि.का.का.सदस्य बाळा सावंत, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, तुळस सरपंच शंकर घारे , शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, ओंकार चव्हाण, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, ता.चिटनीस समीर चिंदरकर, दिपक माडकर, बुथप्रमुख नितीश कुडतरकर, बाळकृष्ण मयेकर, सुनील तेंडोलकर, रोहन प्रभु , सुनील घाग, संदीप तांडेल, काशीनाथ म्हारव, भगवान नाईक, शैलेश जामदार, संतोष साळगांवकर, प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते .