सावंतवाडी रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांसह रूग्णांची पर्यायी व्यवस्था करा…

468
2
Google search engine
Google search engine

मनसेची मागणी; वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना निवेदन सादर…

सावंतवाडी, ता.२६ :उपजिल्हा रुग्णालय बंद असल्यामुळे त्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे व गर्भवती मातांचे हाल होत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्या माध्यमातून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी याठिकाणी येणाऱ्या गर्भवती महिलांची दोडामार्ग कुडाळ येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच अन्य कर्मचार्‍यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन श्री पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना घेराव घातला. यावेळी ऍड अनिल केसरकर, संतोष भैरवकर, राजू कासकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर आदी उपस्थित होते. शहराधक्ष आशिष सुभेदार यांनी रुग्णालय बंद ठेवल्यामुळे डीलव्हरी साठी येणाऱ्या महिला रुग्णाचे हाल होत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो,परिणामी त्या खाजगी रुग्णालयातील भरमसाठ फी गरीब रुग्णांना न परवडणारी आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी प्रशासनाने तात्पुरती पर्यायी उपाययोजना करावी. शेर्ले येथील शासनाच्या कोव्हिड सेंटर मध्ये अपुऱ्या सोइ सुविधा रुग्णांना दिल्या जातात.त्यामुळे अनेक प्रकारच्या गैरसोय निर्माण होत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. अनिल केसरकर यांनी डिलिव्हरी रुग्णांसाठी शहरातील खाजगी डॉक्टर यांची मदत घेतली जावी, रुग्णालय प्रशासनाकडे निधीची तरतुद आहे असे सांगितले. यावेळी पाटील यांनी कोरोना कालावधीत पर्यायी डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टर यांना काही दिवसांसाठी रुग्णालयात नियुक्ती देणार अशी माहिती दिली. शेर्ले कोव्हिड सेंटर बाबत स्वतः जाऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात प्रसूती साठी येणाऱ्या रुग्णांनी कुडाळ तसेच दोडामार्ग येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले डॉक्टर व अन्य कर्मचारी यांचे स्वब नमुने घेण्यात आले आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाचे कामकाज सुरू केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.