सिंधूदिशा शैक्षणिक-सामाजिक संस्थेच्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

237
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२७: सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित राजस्तरिय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटातून मुंबईच्या कु.चिन्मयी गणेश मसुरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर लहान गटातून देवगड येथील कु.वेदांत सचिन तवटे याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.ही स्पर्धा ११ आँगस्ट ते २५ आँगस्ट या कालावधीत दोन गटात घेण्यात आली होती.दरम्यान यात महाराष्ट्रातील ३५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढील प्रमाणे,मोठा गट १० वर्षावरील ते १५ वर्षा आतील व्दितीय क्रमांक- कु.साहिल अजित परब (कणकवली),तृतीय क्रमांक -कु.आबाजी काशीनाथ हिवाळेकर(मालवण),उत्तेजनार्थ क्रमांक-कु.चांगुणा निवृत्ती पाटील(शिरोडा),कु.प्रणाली गजानन बैकर(ठाणे) कु.आयुष दत्तप्रसाद पाटणकर(इन्सुली)
लहान गट-वयोगट ५ ते १० वर्षाआतील,व्दितीय क्रमांक -कु.सानवी शैलेश महाजन (बांदा), तृतीय क्रमांक-कु.सई राजेंद्र पवार(सावंतवाडी),उत्तेजनार्थ- वैभव विलास गवस(नवीमुंबई),कु.मृण्मय चंद्रकांत शिरोडकर(सावंतवाडी)कु.तन्वी प्रसाद दळवी (दोडामार्ग), कु.श्रेया श्याम गायकवाड (पुणे)ह्या बाल चित्रकारांनी यश मिळवले.
स्पर्धेचे परिक्षण फाईन आटिस्ट अपर्णा दळवी यांनी केले. तर जयश्रीताई सुपल यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.दरम्यान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश सावंत ,संतोष ओटवणेकर,विलास राऊळ, प्रशांत परब,समिक्षा ओटवणेकर ,पुर्वा प्रशांत परब रजत गवस,मुकेश नाईक यांनी प्रयत्न केले.तर संस्थाध्यक्ष रुपेश परब यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.