सावंतवाडीत नोटरी पब्लिक कार्यालयाचे उदघाटन…

288
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९:  भारत सरकार मार्फत नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती झालेल्या ऍड क्षितिज परब यांच्या नोटरी कार्यलयाचे उदघाटन सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चीदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
सावंतवाडी येथील हे कार्यालय ज्युलिएट हाऊसिंग कॉम्प्लेक्स, बीएसएनएल ऑफिस समोर, सालईवाडा येथे असून याचा फायदा सर्व जिल्ह्याला होणार आहे. सध्याच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा अत्यंत साधेपणाने करण्यात आला. यावेळी नोटरी व ऍड. प्रकाश परब, जेष्ठ विधितज्ञ ऍड दीपक नेवगी, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, बी एस बांदेकर फाईन आर्ट्सचे चेअरमन रमेश भाट, कवयित्री उषा परब, भूमी प्रॉपर्टी कंन्सल्टंसच्या अनुराधा परब, आरोग्य सभापती नगरसेवक ऍड परिमल नाईक, पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, भरत राजपुरोहित, रविकिरण परब, दीपेश परब व गोविंद बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.