युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून देवानंद लुडबेंना तडकाफडकी हटवले….

348
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून देवानंद लुडबे यांना तडकाफडकी हटविण्यात आले आहे.
तर दुसरीकडे अनुसूचित जातीजमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ टोमके यांना हटवून त्याठिकाणी सावंतवाडीच्या सुनील निरवडेकर यांच्याकडे त्या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर देवगडच्या किरण टेंबुलकर यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे व वेंगुर्ले येथील सिद्धेश परब यांची सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या कडून करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्याकडून देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये असलेला कलगीतुरा संपता संपत नाही बाळा गावडे यांनी आपल्या फळीला बळकट करण्यासाठी वेगवेगळी केली जात आहे त्यामुळे आता जुन्या गटाचे पदाधिकारी बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहेत. युवक जिल्हाध्यक्ष लवकरच देण्यात येणार असल्याचे समजते