वेंगुर्ले शहरात आजच्या रिपोर्ट नुसार ७ रुग्ण पॉझिटिव्ह…

967
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०४: वेंगुर्ले शहरात आज आलेल्या रिपोर्ट स्वॅब तपासणी मध्ये एकूण ७ जण रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.
आज रॅपिड टेस्ट मध्ये भटवाडीमध्ये १ नवीन रुग्ण आढळला. तसेच गाडीअड्डा येथे १ नवीन रुग्ण, आनंदवाडी येथे संपर्कातील ३ रुग्ण, कुबलवाडा येथे संपर्कातील २ असे एकूण ७ रुग्ण वेंगुर्ले शहरातील पॉझिटिव्ह आले आहेत.तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.