ऑनलाईन कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर…

571
2
Google search engine
Google search engine

बांदा नं.१ केंद्र शाळेचे उपक्रम; पालकांसाठी आयोजन…

बांदा,ता.०९: शिक्षक दिनाचे औचित्य साधून बांदा नं. १ केंद्रशाळेच्या वतीने शिक्षकदिनी ‘थँक्स अ टीचर’ या अभियानांतर्गत पालकांसाठी आॅनलाईन कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी शाळा किंवा शिक्षक या दोन्ही पैकी एका विषयावर कविता लिहिण्यासाठी विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत बांदा शाळेतील पालकांनी प्रतिभाशक्तीने स्वनिर्मित कवितांची निर्मिती करून शाळा व शिक्षकंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यास्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
सर्वोत्तम- तानेश्वर रामचंद्र गवस काळसेवाडी (बांदा), प्रथम- रिना निलेश मोरजकर (देऊळवाडी-बांदा), द्वितीय- (विभागून)- गौरी नितीन बांदेकर (गडगेवाडी-बांदा) व पुजा प्रशांत गोसावी. तृतीय- (विभागून) राजश्री राजेंद्र देसाई व सुवर्णा सुधीर तेंडोलककर. उत्तेजनार्थ:- भारती शैलैश महाजन, अनिशा आनंद कोळापटे, स्मिता रामचंद्र पेडणेकर, उमेश मनोहर तळवणेकर.
या स्पर्धेचे परीक्षण कवी संदीप सावंत (तळेखोल ता. दोडामार्ग), कवी प्रमोद चांदेकर (चंदगड, जि. कोल्हापूर), बालकवयित्री स्मिता मुराळी (जि.सोलापूर) यांनी केले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या पालकांना आॉनलाईन ई प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेतील सहभागी व विजेत्या पालकांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदिप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे. सध्या कोवीड १९च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठीही राबविण्यात आलेल्या या ऑनलाईन उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.