वेंगुर्लेत भाजपच्या ‘संघटन ही सेवा’ सप्ताहाचा उद्या शुभारंभ….

132
2
Google search engine
Google search engine

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस: विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वेंगुर्ले, ता. १३: यावर्षी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वेंगुर्लेत दिनांक १४ ते २० सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय नेता व गरीब वंचित दलित आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूता प्रमाणे काम करणारे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. आपल्या देशासाठी अहोरात्र दिवसाचे १६ ते १८ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस काम करणारे आपले लाडके पंतप्रधान यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते विविध प्रकारची सेवा कार्य करून प्रार्थना करतात.
दरम्यान कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज सकाळी वेंगुर्ला भाजप कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भव्य रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड अभियान, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, सागर किनारा स्वच्छता अभियान, मोफत कायदेविषयक सल्ला, रुग्णांना फळ वाटप यासारखे सेवा कार्यक्रम घेण्याचे ठरले. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस तथा सेवा सप्ताह अभियान प्रमुख बाळू देसाई, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, महिला तालुकाप्रमुख स्मिता दामले, जिल्हा कार्यकारणी सदस्य साई प्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक नागेश गावडे, प्रशांत आपटे, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल ,श्री सोमनाथ टोमके, बाळू प्रभू, श्याम सुंदर मुनंनकर, हर्षद साळगावकर, विद्याधर धानजी, श्रीकृष्ण भानजी, समीर चिंदरकर, समीर कुडाळकर, शरद मेस्त्री उपस्थित होते.