रेल्वेस्टेशन परिसरात सडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह सापडला…

1156
2
Google search engine
Google search engine

मळगाव येथील घटना; युवकाची ओळख पटवण्याचे सावंतवाडी पोलिसांसमोर आव्हान…

सावंतवाडी ता.१४: येथील मळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील एका बंद बंगल्यात अनोळखी युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे.ही घटना आज सायंकाळी उशिरा उघडकीस आली.दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.मात्र तो मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

यावेळी पोलीस हवालदार नवनाथ शिंदे,पोलीस हवालदार मनोज राऊत,भूषण भोवर,पोलीस पाटील रोशनी जाधव,ग्रा.प सदस्य गजानन सातार्डेकर,स्थानिक ग्रामस्थ महेश शिरोडकर,सतीश राऊळ आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.