सरमळे येथील आजारी निशांत परब यांना आर्थिक मदत…

521
2
Google search engine
Google search engine

बांदा मराठा समाजाचा पुढाकार;पुढची जबाबदारी संजू परब उचलणार…

बांदा,ता.१८:
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या व सध्या आजाराने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सरमळे येथील निशांत गुरुनाथ परब याला बांदा दशक्रोशी मराठा समाजाच्या वतीने उपचारासाठी १४ हजार रुपयांची आर्थिक मदत सरमळे येथे नातेवाईकांकडे देण्यात आली. यावेळी त्याच्या उपचाराचा यापुढील सर्व खर्च करण्याचे आश्वासन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
मराठा आरक्षणच्या स्थगिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर सरमळे गावातून ५०० हुन अधिक सह्या देण्याचा निर्णय यावेळी मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. बांदा येथे संपन्न झालेल्या समाजाच्या बैठकीत निशांत परब या तरुणावर उपचारासाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत समाजच्या वतीने १४ हजार रुपये गोळा करण्यात आले. ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, बांदा मराठा समाज अध्यक्ष बाळू सावंत, खजिनदार राकेश परब, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, विलवडे सरपंच अजय गावडे, ज्ञानेश्वर सावंत, श्याम सावंत, साई सावंत, विराज परब, विनेश गवस, सोनू दळवी, अभय सावंत, दिपक गावडे, लक्ष्मण सावंत, मंगेश गावडे, संजय गावडे, विजय गावडे, गुरुनाथ गावडे, चंद्रकांत गावडे, शंकर गावडे, नंदकिशोर सरमळकर आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.