वेंगुर्ले येथील शिबिरात ५९ रक्तदात्यांकडून रक्तदान…

112
2
Google search engine
Google search engine

भारतीय जनता पार्टीचे आयोजन…

वेंगुर्ला,ता.२०: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप व प्रदेश सरचिटणीस माजी राज्यमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन साईदरबार हाॅल मध्ये केले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे ५९ बाॅटल रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका साक्षी पेडणेकर, युवा मोर्चा चे हेमंत गावडे, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, रविंद्र शिरसाठ, शेखर काणेकर, तुषार साळगांवकर, संकेत धुरी, समीर चिंदरकर, गणेश गावडे, संदीप पाटील, निलेश मांजरेकर, विजय बागकर, शरद मेस्त्री, यशवंत कीनळेकर, सुनील घाग, निलेश गवस, सुधीर गावडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सावंतवाडी येथील रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात दोन युवतींनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .