सावंतवाडी तालुक्यात आणखी पाच कोरोना बाधीत आढळले…

329
2
Google search engine
Google search engine

शहरातील एक,तर कोलगाव, बांदा,नेमळे आरोंदयातील प्रत्येकी एक

सावंतवाडी,ता.२२: तालुक्यात आज कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.यातील एक रुग्ण शहरातील सबनिसवाडा येथील आहे,तर चार तालुक्यातील आहेत.त्यात कोलगाव,नेमळे,बांदा व आरोंदा असे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत सावंतवाडी शहरात ४२० रुग्ण आढळून आले.त्यातील ३२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यात २१ रुग्ण हे मृत्युमुखी पावले,तर १३ रुग्णांना या ठिकाणाहून अन्य ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले आहेत,तर आता ६० जणांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर व पालिकेच्या आरोग्य अधिकारी उमेश मसुरकर यांनी दिली.