आसोली हायस्कूलच्या ऑनलाईन भावगीत गायन स्पर्धेत आदित्य धुरी प्रथम…

176
2
Google search engine
Google search engine

 

शारदोत्सवानिमित्त आयोजन; संगिता,गौरव,मितेश,दाजी यांचेही यश…

वेंगुर्ले ता.२६: तालुक्यातील आसोली हायस्कूलच्या वतीने शारदोत्सवानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन भावगीत गायन स्पर्धेत आदित्य नंदकुमार धुरी याने प्रथम क्रमांक पटकाविला.तर संगिता संतोष आडेलकर-द्वितीय,गौरव दत्तात्रय पेंडसे-तृतीय तसेच मितेश नारायण धुरी आणि दाजी शरद करंगुटकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेत प्रतिवर्षीप्रमाणे शारदोउत्सव साजरा करण्यात आला.मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करून शारदा मातेचे पूजन करण्यात आले.या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन भावगीत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर व शिक्षक एस.एल.जाधव यांनी केले.