सावंतवाडी मोती तलावात आढळलेल्या “त्या” मृतदेहाची ओळख पटली…

627
2
Google search engine
Google search engine

संबंधित वृद्ध पांजरवाडा परिसरातील; नातेवाईकांनी पटवली ओळख…

सावंतवाडी ता.३१:  येथील मोती तलावात काढलेल्या “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.संबंधित वृद्ध हे येथील पांजरवाडा परिसरातील राहणारे असून गोविंद लक्ष्‍मण चिंदरकर (८५), असे त्यांचे नाव आहे.दरम्यान ही ओळख त्यांचा मुलगा सुहास गोविंद चिंदरकर यांनी पटविली.

याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित वृद्ध हे काल सायंकाळपासून बेपत्ता होते.दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांचे कपडे तलावाकाठी आढळून आले.त्यानंतर नागरिकांमध्ये चर्चा रंगली असतानाच तलावाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.व मृतदेहाची ओळख पटवली.त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.