कणकवली भाजपची विस्तारित कार्यकारिणी जाहीर…

233
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.३१ : भारतीय जनता युवा मोर्चा कणकवलीची विस्तारित कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीवर संधी देण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चा कणकवलीच्या नव्या कार्यकारीमध्ये ग्रामीण उपाध्यक्षपदी सुभाष मालंडकर, अवधूत शेट्ये, प्रफुल्ल काणेकर, सरचिटणीसपदी पवन भोगले, सोशल मीडिया ग्रामीण तालुका अध्यक्षपदी आनंद बांदल, चिटणीसपदी राहुल आंगणे, विजय इंगळे, मिलिंद लाड, साहिल शिरवंडेकर, यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निवड कार्यक्रमावेळी भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, कणकवली ग्रामीण तालुका अध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, जिल्हा चिटणीस संतोष पुजारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सनी पाताडे, बबलू सावंत, युवा मोर्चा ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष शहर गणेश तळगावकर, रमेश पावसकर, सर्वेश दळवी, विजय चिंदरकर उपस्थित होते.