पुढच्या विधानसभेनंतर केसरकर सिंधुदुर्गच्या राजकारणातूनच गायब होतील…

370
nilesh rane
2
Google search engine
Google search engine

निलेश राणे ; कोरोनाकाळात तेच मुंबईत उंदरासारखे लपून बसल्याची टिका…

सिंधुुदुर्गनगरी ता.०२: कोरोनाला घाबरून आमदार दिपक केसरकर हे मुंबईत उंदरासारखे लपून बसले होते.त्यामुळे आता येणार्‍या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर ते सिंधुदुर्गच्या राजकारणातूनच कायमचे गायब होतील,अशी बोचरी टिका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टिका करून श्री.केसरकर यांनी आज पर्यत संबंध महाराष्ट्रात ओळख मिळविली,मात्र आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही,असेही श्री.राणे यावेळी म्हणाले.
केसरकर यांनी दोन दिवसापुर्वीच्या दौर्‍यात श्री.राणेंवर उंदराच्या ढुम ढुम ढुमाक या गोष्टीचे उदाहरण देवून टिका केली होती.त्याला श्री.निलेश राणे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.ते म्हणाले, केसरकर यांना आता शिवसेनेत कोणी विचारत नाही.त्यांची अवस्था निवडणूकी नंतर शिवसेनेत काय झाली आहे,हे लोकांनी पाहीले आहे.त्यामुळे या विषयावर न बोललेलेच बरे ,त्यांनी आपल्या मतदार संघात कोरोनाच्या काळात स्वखर्चाने साधा मास्क आणि सॅनिटारझर सुध्दा वाटले नाही.त्यामुळे अशा माणसाने थेट राणेंवर टिका करणे कीतपत योग्य,असाही प्रश्न करीत ते कोरोनाला घाबरून उंदरासारखे मुुंबईत लपून बसले, अशी टीका त्यांनी केली.