दयानंद कुबल यांचा “एक रियल हिरो” अशी उपाधी देवून सन्मान…

233
2
Google search engine
Google search engine

एचडीएफसी बँकेने घेतली दखल; कोरोना काळात केले तळागाळात जाऊन काम…

बांदा,ता.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले दयानंद श्रीराम कुबल यांना एचडीएफसी या राष्ट्रीयीकृत बँकेकडून गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, सिंधुदुर्ग तसेच इतर अनेक जिल्ह्यात गरीब, बेरोजगार आणि बेघर लोकांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप, तसेच रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या लोकांना ठाणे येथे अन्नदानाचे केलेले कार्य बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या एच.डी. एफ.सी. बँकेने विचारात घेऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आपल्या आसपास काम करणारा “मुंबईतील एक रिअल हिरो” अशा आशयाखाली आपल्या वेबसाईटवर उल्लेखित करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा केला आहे. दयानंद कुबल हे कोकण संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामात कोकण विकास आघाडीच्या माध्यमातुन त्यांनी सावंतवाडी तालुक्यात संपर्क प्रमुख म्हणून काम करताना कामाचा ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबीरे, रोजगार मेळावे, महिलांसाठी मोफत शिवणक्लास व नर्सिंग वर्ग यांचे ते वेळोवेळी आयोजन करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो:-
दयानंद कुबल