अखेर जिल्हयातील दुर्ग किल्ले पर्यटकांसाठी सुरू…

157
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकार्‍यांचा हीरवा कंदील; पर्यटन सुरू झाल्याने स्थानिक सुखावले…

सिंधुदुर्गनगरी ता.१७: कोरोनाच्या काळात गेले अनेक महीने बंद असलेली कील्ले आणि दुर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन घेण्यात आला आहे.त्याबाबतचे आदेश रात्री उशिरा देण्यात आले.त्यामुळे याचा फायदा जिल्हातील व्यापारी आणि स्थानिकांना होणार असून गेले काही दिवस थंडावलेले पर्यटन पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आहे.दरम्यान दुर्ग आणि कील्ले जरी पर्यटनासाठी खुले करण्यात आले,तरी त्या ठीकाणी जाताना पर्यटकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.सोशल डीस्टंन्सिग मास्क आदी नियम पाळथावे लागणार आहेत.असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन कळविण्यात आले आहे.