सौंदाळे बाऊळवाडी शाळेतील विद्यार्थी इंटरॅक्टिव्ह कन्टेन्टच्या मदतीने घेत आहेत शिक्षणाचे धडे…

251
2
Google search engine
Google search engine

उपक्रमशील शिक्षक दीपक डवर यांचा अभिनव उपक्रम…

वैभववाडी,ता.२५:कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद आहेत. या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील सौंदाळे बाऊळवाडी प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. इंटरॅक्टिव्ह कन्टेन्टच्या मदतीने विद्यार्थी या उपक्रमातून घरबसल्या शिक्षणाचे धडे घेत आहेत. प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक दीपक तानाजी डवर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात गेली नऊ महिने शाळा बंद आहेत. परंतु ग्रामीण भागात काम करणारे काही हरहुन्नरी शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी धडपडत आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून काही शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सौंदाळे बाऊळवाडी प्रशालेचे शिक्षक श्री. डवर यांनी शिक्षणावरील संकटावर करू मात, आहे डिजिटल कृतीयुक्त शिक्षणाची साथ. या प्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या उपक्रमांतर्गत डवर यांनी प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप बनविले आहेत. त्या ग्रुपवर इंटरॅक्टिव्ह कन्टेन्ट पाठविल्याने विद्यार्थी घरबसल्या डिजीटल कृतीयुक्त शिक्षण घेत आहेत.
इंटरॅक्टिव्ह कन्टेन्टमध्ये इंटरॅक्टिव्ह व्हिडीओ, फील इन द ब्लांक, इमेज स्किन्सिग, मेमरी गेम, समरी, ट्रेस द वर्ड, फाईंड द वर्ड, स्क्विन्सिंग, क्लासिफिकेशन इत्यादी सारख्या वेगवेगळ्या वीस प्रकारचा इंटरॅक्टिव्ह कन्टेन्ट तयार करण्यात आला आहे. या कन्टेन्टचा उपयोग जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर विद्यार्थ्यांना ही चांगल्या प्रकारे होत आहे. हा उपक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक तुषार अवटी, तोळाराम पवार, मुख्याध्यापिका सुनिता भोसले, केंद्रप्रमुख श्री. जाधव यांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण मोडे, माजी पं.स. सदस्य प्रकाश गुरव, उपसरपंच मुकेश गुरव, अशोक मोरे, उपाध्यक्ष दीपक कामतकर तसेच समिती सदस्य, पालक यांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे.