वादात सापडलेला “तो” स्टॉल पालिकेने पुन्हा हटवला…

972
2
Google search engine
Google search engine

संजू परबांकडुन कारवाई; पुन्हा स्टॉल उभारल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा…

सावंतवाडी,ता.२६: येथिल बाजारपेठेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन करून पुन्हा उभारलेला “तो” वादातीत स्टॉल आज पुन्हा काढुन टाकण्यात आला .पालिकेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.याबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी दुजोरा दिला आहे.आता पुन्हा स्टॉल उभारण्याचा प्रयत्न झाल्यास संबधितांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करू,असा इशारा श्री.परब यांनी दिला आहे.

दरम्यान आपण दुकानात नसताना ही कारवाई करण्यात आली.आपण जेवायला गेलो होतो,ही संधी पालिका कर्मचार्‍यांकडुन साधण्यात आली.असे संबधित स्टॉल चालकाकडुन सांगण्यात आले.आपल्याला मुख्याधिकार्‍यांनी चर्चेसाठी बोलावले होते.मात्र त्यापुर्वीच ही कारवाई करण्यात आली,अशी त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.