कोविड मृतांना खांदा देता देता, स्वतःच्या वडिलांना अग्नी देण्याची वेळ…

789
2
Google search engine
Google search engine

इन्सुलीतील ख-या कोरोना योध्दयाची व्यथा; वडिलांनी दिलेला कानमंत्र आयुष्यभर पाळणार…

सावंतवाडी,ता.०६: ऐन कोरोनाच्या काळात दुसर्‍यांच्या मृतदेहाला अग्नी देणार्‍या तालुक्यातील इन्सुली येथील युवकावर स्वतःच्याच वडीलांना अग्नी देण्याची वेळ आली आहे.हेमंत वागळे असे त्याचे नाव असू त्याचे वडील आणि चराठे शाळेचे निवृत्त शिक्षक सत्यवान वागळेे यांचे काल दुपारी कोविडने निधन झाले.त्यामुळे आपल्यावर आलेल्या परिस्थितीमुळे हा कोविड योध्दा काहीसा गडबडला आहे.मात्र काही झाले तरी वडीलांनी दिलेला समाज कार्याचा वसा आपण निश्चितच पुढे चालवू,असा पण करून पुन्हा एकदा त्याने काम करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना म्हणजे मोठा आजार तो अनेकांना ग्रासतो.अनेक माणसे मृत्यूमुखी पडतात,अशी परिस्थिती मार्च महिन्यात निर्माण झाली.अशा परिस्थितीत कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणे सोडाच परंतू त्यांचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठीही कोणी पुढे येत नव्हते,अशा परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील युवकाने पुढाकार घेतला. आणि जीवनावर बेतणारा असला तरी सामाजिक कामासाठी हा इंद्रधनुष्य आपण पेलू,असा पण करून त्याने स्वतःला या सामाजिक कामात वाहून घेतले.कोरोनाच्या या नऊ महिन्याच्या काळात गेल्या सहा ते सात महिन्यात त्याने अनेक मृतदेह आणले.आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले.या सर्व परिस्थिती मृताच्या नातेवाईकांनी त्यांना आर्शिवाद दिले.काहींनी या प्रवासात त्याला मदतही दिली.आणि पुढच्या जीवनासह प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
हा प्रवास सुरू असताना आता कोरोना जाईल, असे वातावरण तयार झाल्यामुळे हेमंत यांच्या वडीलांनी आपल्याला अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली.वडीलांनी केलेली मागणी नाकारणार कशी,असे वाटल्यामुळे ते आपल्या पुर्ण कुंटूबासह अक्कलकोट येथे जावून आले.मात्र दुसर्‍याच दिवशी वडीलांना ताप येण्यास सुरू झाली.अशा परिस्थितीत कोविड टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला.आणि त्यात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालविली. या सर्व प्रवासात आपण कोविडसाठी काम करीत असताना आणि आत्ता पर्यत तब्बल५० हून अधिक मृतदेहावर अत्यंसंस्कार केले असताना ५२ वा मृतदेह माझ्याच वडीलांचा असेल, हे मला वाटले नव्हते,असे श्री.वागळे सांगतात. नशीबात जे वाढले होते त्यांचा स्विकार करायलाच पाहीजे. मात्र आता वडीलांनी दिलेला वसा असाच पुढे चालू ठेवून रुग्णसेवेला महत्व देण्याचा मानस वागळे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता माझ्या वडीलांचे देवदर्शनासाठी जाण्याचे स्वप्न मी पुर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे.असेही त्यांनी सांगितले.