वाफोली येथील श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…

238
2
Google search engine
Google search engine

बांदा, ता.७:
वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी दिनांक ८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे शासनाचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. कोव्हीड १९ चे सर्व नियम पाळून रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच भाविकांना सामाजिक अंतर पाळून रांगेत दर्शन मिळणार आहे. सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून ओटी भरणे, पालखी सोहळा, देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष विलास गवस यांनी केले आहे.