ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष नाईक…

207
2
Google search engine
Google search engine

.सचिवपदी किशोर नाचणोलकर यांची निवड…

मालवण, ता १५ : ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष नाईक तर सचिवपदी किशोर नाचणोलकर यांची निवड करण्यात आली आहे.
जागतीक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांच्यासाठी माध्यमिक शिक्षक पतपेढी नाचणे रत्नागिरी येथे मानवाचे मूलभूत अधिकार व कर्तव्य करते या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाचे ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक घनश्याम सांडीम उपस्थित होते. त्यांनी सभासदांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिक पातळीवर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्या सोडविल्या जातील. काही समस्यांबाबत स्थानिक पातळीवर मार्ग न निघाल्यास वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण केले जाईल याबाबत आश्वस्त केले. राज्य मानवी हक्क आयोगाकडे याचिका दाखल करून काही प्रकरणात दाद मागितली जाईल. संघटनेने दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी संदर्भात माहिती दिली. सातारा जिल्हा संपर्क प्रमुख केदार नाईक यांनी ग्राहकांचे हक्क व मानवाधिकार याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी- जिल्हा निरीक्षक- मनोज तोरसकर, जिल्हा उपाध्यक्ष- नारायण कुबल, नंदन घोगले, जिल्हा महिला संघटक- मानसी परब, गीतांजली कामत, जिल्हा जनसंपर्क अधिकारी डॉ. राजेंद्र पाताडे यांचा समावेश आहे.
यावेळी मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, वैभववाडी, देवगड तालुका कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमास सातारा जिल्हा निरीक्षक भालचंद्र निंबकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. अंकलगी यांनी केले. अरुण मोर्ये यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पेजे व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.