“त्या” चाकू हल्र्ल्यातील टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

1533
2
Google search engine
Google search engine

गोवा-बांबुळीत होते उपचार सुरू; दारूच्या पैशासाठी झाली होती मारहाण…

सावंतवाडी ता.१६: येथे झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या “त्या” टेम्पो चालकाचा गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी घडली.त्याच्यावर दारूच्या पैशासाठी हल्ला करण्यात आला होता.यात त्याच्या पोटाला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती.याबाबत अधिक माहिती अशी की,येथील गवळी तिठा परिसरात झालेल्या या हल्ल्यात कोल्हापूर येथील ट्रकचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (४६) रा. हतकणंगले-कोल्हापूर हा गंभीर जखमी झाला होता.तो गगनबावडा येथून आयशर टेम्पो मधून ग्रॅनाइट व स्टाइल्स घेऊन रात्री उशिरा सावंतवाडीत आला होता.यावेळी चंदन उर्फ सनी अनंत आडेलकर (रा.गरड) व अक्षय अजय भिके (रा.गोवा) या दोघांनी त्याला लुटण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला होता.दरम्यान त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते.त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.तर मारहाण करणाऱ्या संबंधित दोघाही संशयितांना बारा तासांच्या आत पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.