डिंगणे कोतवाल आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण…

1050
2
Google search engine
Google search engine

आत्महत्या करण्यास भाग पाडले मुलीची तक्रार ; बांदा पोलिसांनी घेतली दोघांना ताब्यात…

बांदा,ता.१६:
डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाला आज वेगळेच वळण मिळाले. मयत नाईक यांची कन्या ऐश्वर्या संतोष नाईक यांनी आपल्या वडिलांना आत्महतेस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली. बांदा पोलिसांनी डिंगणे येथून नितीन श्रीधर सावंत व चंद्रकांत गणपत सावंत यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. डिंगणे माती उत्खनन प्रकरणी विचारलेल्या जाबातून घसबरून संतोष नाईक यांनी आत्महत्या केल्याचे ऐश्वर्या हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
बांदा पोलिसात दोघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव करत आहेत.