आजची ती उद्घाटने अनधिकृत,आम्ही पुन्हा प्रॉटोकॉलनुसार करू…

648
2
Google search engine
Google search engine

सतिश सावंत ; सावंतवाडीतील झालेल्या स्टॉल वादाचे परिणाम भविष्यात नक्कीच दिसतील

सावंतवाडी,ता.३०: नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडुन आज ओढून ताणून करण्यात आलेले विकासकामाचे उद्घाटन म्हणजे आयत्या बिळात नागोबा,असा प्रकार आहे. आजची उदघाटने ही अनधिकृत आहेत. त्यामुळे आम्ही प्रोटॉकॉल पाळून पुन्हा याची शासकीय उद्घाटने करू,असा दावा शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी आज येथे केले.दरम्यान यापुर्वी इतकी वर्षे कधी नगरपालिका आणि स्टॉलधारकांमध्ये वाद दिसले नव्हते.मात्र आता हे दिसत आहे.आणि याचे परिणाम निश्चितच भविष्यात दिसतील,असे सावंत यांनी सूचक विधान केले आहे,असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी सांगेली येथिल ग्रामपंचायत सदस्य दिपक सांगेलकर,माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचा उपविभागीय अध्यक्ष बबन सांगेलकर,संतोष नार्वेकर,दिलीप राउळ,विजय राउळ, विनायक सावंत,रमाकांत राउळ,पुरूषोत्तम राउळ जीवन लाड आदी भाजपाच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राउळ,अशोक दळवी,मायकल डीसोझा,विनायक सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सावंत म्हणाले,या ठीकाणी नगराध्यक्ष परब यांनी आज केलेली जी उदघाटने आहेत.त्यासाठी आवश्यक असलेला निधी हा तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आणला होता. दुसर्‍याने आणलेल्या निधीतील विकासकामांचे उदघाटन करून आपण श्रेय घेणे हे नगराध्यक्षांना शोभत नाही.आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायती निवडणूकात असलेले ११९ महाविकास आघाडीचे सदस्य जिंकून येतील आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.